‘अबाल वृद्धांचे आशीर्वाद परिवर्तन घडवणार’; तुषार सहाणे
इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत मांडले "विकासाचे व्हिजन"

पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणी नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते तुषार सहाणे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी यावेळी जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.
या प्रचारादरम्यान त्यांनी इंद्रायणी नगर, तिलक रेसिडेन्सी, सहारा स्वीट, निसर्ग कॉलनी, संजीवनी कॉलनी आणि द्वारका विश्व सोसायटी या भागांमध्ये त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. विशेषतः आबाल वृद्धांचे आशीर्वाद घेत प्रचार सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चित्र दिसून आले.
हेही वाचा – ‘प्रभू श्रीकृष्ण आणि हनुमान जगातील महान मुत्सद्दी’; परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर
या प्रचारादरम्यान जेष्ठ नागरिक, माता भगिनी तसेच युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक वर्षांपासून या भागात उच्चशिक्षित, संस्कारी आणि काम करणारे नेतृत्व म्हणून तुषार सहाणे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे यावेळी बदल घडवायचा आणि चांगले नेतृत्व या भागातून महापालिकेच्या सभागृहात न्यायचे असा निर्धारच नागरिकांनी केला आहे.
सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे प्रतिसाद
2017 च्या निवडणुकीत अत्यंत निसटता पराभव झाल्यानंतरही तुषार सहाणे यांनी प्रभागाशी नाळ तोडली नाही. सातत्याने जनसंपर्क ठेवत सामाजिक बांधिलकी जपली. कोरोनाच्या काळात केलेले सामाजिक कार्य आजही नागरिकांच्या लक्षात आहे. त्यामुळे तुषार सहाणे यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी चिंचवड शहरासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी रूट लेव्हलला काम केलेले आहे. आज जो सकारात्मक बदल या शहरात दिसतो. तो केवळ अजित पवार यांची दूरदृष्टी आहे.या शहरासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने पालक म्हणून भूमिका निभावलेली आहे. त्यांच्या संकल्पनेतील शहर घडवण्यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये त्यांना सक्षम करणारे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आपल्याला पुन्हा एकदा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी द्यायची आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून नक्कीच शहर पुन्हा विकासाच्या दिशेने धावेल यात शंका नाही.
– तुषार सहाणे,युवा उद्योजक





