निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस “ॲक्शन मोड”वर
पिंपरी-चिंचवड शहरातील ३५ गुंड तडीपार

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात एकूण ३५ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या गुन्हेगारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.
परिमंडळ एक: परिमंडळ एक अंतर्गत गंगाधर देवेंद्र नाटेकर, अजय सुखदेव माने यांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. आकाश अतुल कदम, शुभम उर्फ सोन्या सुनील गायकवाड, अनिकेत दत्ता वाघमारे, शुभम बबन नावले यांना एक वर्षासाठी, तर आयूब चमन खान, विशाल रामधन खरात यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
परिमंडळ दोन: परिमंडळ दोनमध्ये अर्जुन पूनम कुंभार याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. याच परिमंडळातून प्रशांत अरुण दुबे याला एक वर्षासाठी, तर रोहन वासदेव वाघमारे, मयूर सुहास मुरहे, यशोदास विजय राठोड, आकाश रवी मैनावत, ऋतिक बन्सी ढसाळ, गौरव उर्फ बॉक्सर बन्सी ढसाळ, रोहित महादेव सोनवणे, धीरज दादा वाघमारे, अमन अमिन शेख यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
परिमंडळ तीन: परिमंडळ तीनमध्ये सागर उर्फ रत्नदीप सत्यवान कांबळे, राजकुमार राममूरत बिंद यांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सनी विजय शहा, पायल रोहित कुंभार, परशुराम प्रदीप ढेपे, हरिओम लक्ष्मण जोगदंड, अरुणा गब्बर राजपूत यांना एक वर्षासाठी, तर मंगलसिंग पोलादसिंग भोड, अशोक उर्फ नन्या सोतल गोंधणे, रोहित बापू पारवे, बालाजी नंदे शिंदे, अरुण अनिल गोटे, नितीन पोपट तांबे, विक्रांत विठ्ठल राऊत, योगेश दत्ता लहाने आणि केतन प्रकाश शिंदे यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.





