TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

सोन्याचा भाव पोहोचणार थेट 2 लाखांवर?

2026 सालाची मोठी भविष्यवाणी समोर!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठे-चढउतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीआधी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत चांगलीच वाढली होती. दिवाळीनंतर मात्र सोने आणि चांदीचा भाव पडला. आता पुन्हा एकदा हे दोन्ही धातू चांगलेच चमकताना दिसत आहेत. चांदीच्या भावाने तर विक्रीम 2 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. दरम्यान, आता नव्या वर्षात सोने, चांदीची दिशा कोणती असेल? दोन्ही धातूंचा भाव वधारणार की किंमत कमी होणार? असे विचारले जात आहे. एक अंदाजानुसार तर सोन्याचा भाव थेट एक लाख 90 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

नेमका नवा अंदाज काय?
मिळालेल्या माहितीनुसार 2025 साली आतापर्यंत सोन्याच्या भावात साधारण 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही तेजी 2026 सालीदेखील कायम राहणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबतचा आता एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे सीईओ डेव्हिड टॅट यांनी 2026 या वर्षी सोन्याचा भाव सध्याच्या तुलनेत तब्बल 39 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे सांगितले आहे. हा अंदाज खरा ठरला तर जागतिक बाजारात सोन्याचा भाव 6 हजार डॉलरचा टप्पा पार करेल. भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर सोन्याचा भाव थेट 1 लाख 90 रुपयांपर्यंत वाडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  अपप्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देऊन पक्ष प्रतिमा व पक्षाच्या परंपरेला गालबोट लावून देऊ नका..!

सोन्यात अशी होऊ शकते वाढ
टॅट यांनी सांगितल्यानुसार सोने, चांदीचा भाव भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. 2026 साली सोन्याचा भाव 6000 डॉलर्स प्रती औंस म्हणजेच 541,920 रुपये प्रति औंस (1.90 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम) रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

दरम्यान, बुधवारी सोन्याचा भाव 4,321 डॉलर्स प्रति औंसवर पोहोचला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा भाव 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीदेखील सोन्याचा भाव असाच वाढू शकतो, अशी शक्यता टॅट यांनी व्यक्त केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button