Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

भारतासाठी अभिमानाचा क्षण! ‘होमबाउंड’ चित्रपट ऑस्कर 2026 साठी शॉर्टलिस्ट

नीरज घायवान दिग्दर्शित चित्रपटात विशाल जेठला, ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत

Homebound | नीरज घायवान दिग्दर्शित भारतीय चित्रपट ‘होमबाउंड’ याने जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढवला आहे. अभिनेता ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2026 च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. ऑस्करच्या या टप्प्यात एकूण 15 चित्रपटांचा समावेश असून, त्यामध्ये ‘होमबाउंड’ची निवड ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे.

याआधी ‘होमबाउंड’ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रचंड दाद मिळाली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तब्बल 9 मिनिटे प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करताना दिसले होते. त्यानंतर आता ऑस्कर 2026 च्या शर्यतीत या चित्रपटाने थेट टॉप 15 मध्ये स्थान मिळवले आहे. हा चित्रपट 98 व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताकडून पाठवण्यात आला होता.

हेही वाचा     :            निर्यातीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘अंतरमंत्रालय गट’ स्थापन

2026 च्या ऑस्करसाठी निवडलेल्या पाच चित्रपटांची अंतिम घोषणा 22 जानेवारी 2026 रोजी केली जाईल. 2026 चा ऑस्कर 15 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये कॉमेडियन कॉनन ओ’ब्रायन पुन्हा एकदा होस्ट करणार आहेत.

होमबाउंड सोबतच, आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये नामांकन मिळालेल्या इतर देशांमधील चित्रपटांमध्ये अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटीमेंट व्हॅल्यू”, पॅलेस्टाईन 36 फ्रॉम पॅलेस्टाईन, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सैराट”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group