Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत दिमाखदार यश

शिक्षण विश्व: तिसऱ्यांदा विजेतेपद घेऊन तीन खेळाडूंची राष्ट्रीयस्तरावर निवड

पिंपरी चिंचवड: अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे गोल्डन अकॅडमीमध्ये झालेल्या शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील मुलांच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावून तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला आहे

या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ जाहीर झाला असून रोनित पोद्दार अकरावी कॉम इंग्लिश स्वराज थरकुडे बारावी कॉम इंग्लिश आणि ध्रुविल रायठ्ठा अकरावी कॉम इंग्लिश या तीन खेळाडूंची तेलंगणा राज्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे

विजयी संघात तन्मय माने स्वराज थरकुडे ध्रुवील रायता किरण सुर्वे साई गुंजाळ आदित्य शेंडगे शौर्य पाटील सोहम मोहिते रोनित पोद्दार अखिलेश पाटील आर्यन चव्हाण जय गोंदकर मुकुंद बाबर तेजस गिलबिले तन्मय पाटील आणि विहान बागड या खेळाडूंचा समावेश होता संघाला शारीरिक शिक्षण संचालक प्रा गोपीचंद करंडे आणि प्रशिक्षक दत्तात्रय वाळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले

हेही वाचा – लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि भोसरीचे प्रथम आमदार विलासराव लांडे यांनी संघाचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे खजिनदार आणि मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, पिंपरी मनपाचे माजी नगरसेवक आणि संस्थेचे विश्वस्त विक्रम लांडे, प्राचार्य डॉ. के जी. कानडे, उपप्राचार्य प्रा किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा योगिता बारवकर, प्रा संगिता गवस तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण

राज्यस्तरीय स्पर्धेतील हे यश आणि तीन खेळाडूंची राष्ट्रीय निवड हा महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेतील आणखी एक अभिमानाचा क्षण ठरला असल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले आहे .

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button