मास्टर चॅम्प सिंगल कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिक्षण विश्व: मास्टर माइंड ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित स्पर्धेत १६० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी | मास्टर माइंड ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेज भोसरी येथे मास्टर चॅम्प सिंगल कॅरम स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला प्रियदर्शनी स्कूल मॉडर्न हायस्कूल आर्यन वर्ल्ड स्कूल शिर्के स्कूल रत्नागिरी तसेच इतर अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर यांनी केले. स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द इयर हा मानाचा किताब मॉडर्न हायस्कूलने जिंकला तर मास्टर माइंड स्कूल चक्रपाणी यांनी सर्वाधिक विद्यार्थी सहभागी करून विशेष द्वितीय क्रमांक मिळवला.
हेही वाचा : मिशन- PCMC: भाजपाकडे अर्ज जमा करून निशा यादव निवडणूक रणांगणात!
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व ट्रॉफीद्वारे गौरविण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या खेळाच्या शिक्षिका प्रियंका पांचाळ इतर शिक्षक आणि पालकांचे आभार मानले.





