Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“… म्हणून मी गृहमंत्री अमित शाहांना भेटलो”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं दिल्लीवारीचं कारण

Eknath Shinde on Delhi Visit : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यातील राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीत एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यावरून घटक पक्षातील नाराजी उघड झाली आहे. यातच शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीचा दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील घडामोडींवरून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. मात्र या भेटीनंतर स्वतः एकनाथ शिंदेंनीच माध्यमांना माहिती देताना भेटीचे कारण सांगितले.

बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र एनडीएत वाद सुरू आहेत. त्यामुळे नाराजीतून ही भेट झाली का? असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, तक्रारीचा पाढा वाचून रडणारा एकनाथ शिंदे मुळीच नाही. मी रडणारा नाही तर लढणारा आहे. छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो.

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज दिल्ली वारी झाली का? असाही एक प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे प्रश्न इथे राष्ट्रीय पातळीवर मांडायचे नसतात. काल मुख्यमंत्र्याबरोबर बसलो, आमची चर्चा झाली. त्यातून महायुतीला गालबोट न लावण्याचा निर्णय घेतला. महायुतीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला काल सूचना दिल्या गेलेल्या आहेत.

हेही वाचा –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईनरित्या जमा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या (शिंदे) काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यावरून नाराजीनाट्य सुरू झाले, अशी एक अटकळ बांधली जात होती. मात्र एकनाथ शिंदेंनी ही शक्यताही फेटाळून लावली. “रवींद्र चव्हाण यांच्याबाबतचा विषय कालच संपला आहे. त्या विषयाला मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. सदर विषय दिल्लीत आणायचे कोणतेही कारण नाही. कालच्या बैठकीत आमच्या लोकांना जे सांगायचे ते मी सांगितले आहे”, असे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केले.

बिहार निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला. या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. बिहारमध्ये एनडीएचा देदीप्यमान असा विजय झाला. घटकपक्ष म्हणून शिवसेनेलाही या विजयाचा आनंद झाला. उद्या बिहारला जात असताना आज अमित शाहांना भेटून त्यांचे अभिनंदन करण्याचा विचार होता. त्यानुसार आज भेट घेतली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button