Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नितीन गिलबिले हत्येतील आरोपी विक्रांत ठाकूर ताब्यात; अमित पठारे अद्याप फरार

पिंपरी | नितीन गिलबिले हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी विक्रांत ठाकूरला लोणावळा अँबीवली परिसरातून ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अमित पठारे मात्र अद्यापही फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी फॉर्च्युनर गाडीतून नितीन गिलबिलेंवर पिस्तुलातून जवळून गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले आणि पायावरून गाडी घालून दोन्ही आरोपी तेथून पसार झाले होते. या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून हत्येची क्रूरता स्पष्टपणे दिसून येते.

हेही वाचा     :          महापालिका मतदार यादी वेळापत्रकात पुन्हा बदल; प्रारूप यादी २० नोव्हेंबरला 

प्राथमिक तपासात प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यापैकी विक्रांत ठाकूरला पोलिसांनी अटक केली असून अमित पठारेचा शोध वेगाने सुरू आहे.

अमित पठारे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर या हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button