Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नवनीत राणा रवी राणांच्या पक्षाविरोधात प्रचार करणार? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!

अमरावती : जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या ‘कोअर कमिटी’ने (प्रमुख समिती) घेतला आहे. दुसरीकडे, भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यास नवनीत राणा या पतीच्या पक्षाविरोधात प्रचार करतील का, हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

युवा स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटीने सर्व तालुक्यांचा दौरा केला. इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत एक सर्वसमावेशक अहवाल पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे सुपूर्द केला. सर्वच तालुक्यांमधून संपूर्ण पॅनल उभे करण्याचा एकमुखी सूर आल्याने, आता रवी राणा नेमकी कोणती रणनीती आखतात, यावर ‘युवा स्वाभिमान’चे भवितव्य ठरणार आहे.

कोअर कमिटीत राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठ कात्रे, मार्गदर्शक सुनील राणा, शैलेंद्र कस्तुरे, निलेश कुलकर्णी, हरीश चरपे, प्रा. अजय गाडे, अ‍ॅड. नंदेश अंबाडकर, जिल्हाध्यक्ष अजय देशमुख, महिला जिल्हा अध्यक्ष सोनाली नवले यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या व कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला. संपूर्ण जिल्ह्यात ‘युवा स्वाभिमान’चे पॅनल उभे करून ही निवडणूक ताकदीनिशी लढवावी, असे मत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा –  पुढील दोन दिवस सावधानतेचे, राज्यात पाऊस अन् थंडीची लाट, अलर्ट जारी

कोअर कमिटीने हाच अभिप्राय, मुलाखतींचा तपशील आणि आपला निर्णय असा सविस्तर अहवाल आमदार रवी राणा यांच्या सुपूर्द केला आहे. आता अंतिम निर्णय आमदार रवी राणा घेणार असून, ते कोणत्या रणनीतीने निवडणुकीला सामोरे जातात, याकडे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांबरोबरच सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

नवनीत राणा यांना गेल्या आठवड्यात पायाला झालेल्या गाठीमुळे नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्या उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील २० दिवस त्यांना पूर्ण ‘बेडरेस्ट’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवनीत राणा यांच्या पायाला झालेली दुखापत ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात झालेल्या फ्रॅक्चरशी संबंधित असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले होते.

आता नवनीत राणा प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होणार का, भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष स्वतंत्ररीत्या निवडणूक लढल्यास त्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार का, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button