Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

भाजपाला अनुकूल राष्ट्रवादीला फटका!

अनुकूल प्रभागांसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची धावाधाव!

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तब्बल साडेतीन वर्षाहून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली. ही आरक्षण सोडत पाहिल्यानंतर भाजपला अनुकूल असे चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांना फटका बसला असून प्रस्थापितांना आपला बांधलेला प्रभाग सोडून अनुकूल प्रभागासाठी इतरत्र धावाधाव करावी लागणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात 2017 ला भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या. तर, 2012 मध्ये थम्पिंग मेजॉरिटी मध्ये ८३ जागा मिळविलेल्या राष्ट्रवादीला 2017 मध्ये आमदार महेश लांडगे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप या जोडगोळीने अक्षरशः धोबीपछाड करत विरोधकांच्या बाकावर बसवले. 2017 मध्ये राष्ट्रवादीला केवळ 36 वर समाधान मानून विरोधी बाकावर बसावे
लागले होते.

हेही वाचा     :              कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीतील वाहतुकीत बदल; या मार्गांवरून प्रवास टाळा 

प्रस्थापितांना धक्का!

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. यात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे ज्या दोन प्रभागातून तयारी करत होता. तिथे महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे . यामुळे आता अन्य प्रभागाचा विचार आमदार बनसोडेना करावा लागणार आहे. यासोबतच भाजपच्या सत्तेतील पहिल्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शिलवंत यांना ही धक्का बसला आहे. यांसह अन्य माजी नगरसेवकांना इतर प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे. याशिवाय आशा शेडगे, तुषार कामठे, मयूर कलाटे, शाम लांडे, सुलक्षण शिलवंत धर यांच्या सह अनेक दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडले नाही. झालेल्या या सोडत कार्यक्रमांनुसार दिग्ग्जनाना बांधलेला प्रभाग सोडून इतरत्र धावाधाव करावी लागणार आहे.

भाजपचा शंभर प्लस निर्धार..

भाजप पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगली कामगिरी करेल असा दावा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केला आहे. मागील पंचवार्षिकच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करून शंभर प्लस जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. यानुसार पडलेली आरक्षणे ही भाजपला अनुकूल अशी आहेत. भाजपामध्ये येण्यास शहरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार भाजपकडे आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक नक्कीच यशस्वी होणार आहे. या निवडणुकीत महापौर हा भाजपचाच असेल असा विश्वास आहे.

– शंकर जगताप, निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button