Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘टॅरिफ’ला विरोध करणारे लोक मूर्ख आहेत; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची जगभरात मोठी चर्चा सुरु आहे. जपान, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारतासह अनेक देशांवर ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले होते. या टॅरिफमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ परदेशातच नव्हे, तर अमेरिकेतील नागरिकांनीही या धोरणावर नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी टॅरिफ धोरणाचे समर्थन करत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “टॅरिफला विरोध करणारे लोक मूर्ख आहेत.” तसेच, लवकरच बहुतेक अमेरिकन नागरिकांना २००० डॉलर्सचा ‘टॅरिफ डिव्हिडंड’ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

ट्रुथ सोशल अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या व्यापार धोरणावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ट्रम्प म्हणाले की, जे लोक टॅरिफचा विरोध करत आहेत, ते मूर्ख आहेत. त्यांच्या प्रशासनाने अमेरिकेला जगातील सर्वात श्रीमंत, सर्वात प्रतिष्ठित देश बनवलं आहे. जिथे जवळजवळ कोणतीही महागाई नाही आणि विक्रमी शेअर बाजार किंमत आहे.

हेही वाचा     :        राज्यात आजपासून निवडणुकीची रणधुमाळी; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू

देशाला टॅरिफमधून ट्रिलियन डॉलर्स मिळत आहेत. ज्याचा वापर ३७ ट्रिलियन डॉलर्सचं राष्ट्रीय कर्ज कमी करण्यासाठी केला जाणार आहे. त्यांचं प्रशासन लवकरच ते फेडण्यास सुरुवात करेल आणि जवळपास सर्व अमेरिकन लोकांना प्रति व्यक्ती किमान २००० डॉलर्सचा लाभांश जारी करेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button