Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळी गोड! 410 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात लवकरच पुढील हप्ता जमा होणार आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अशातच लाडक्या बहिणांच्या खात्यात लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आली होती. आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. याच हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 410 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

हेही वाचा –  महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका, मेस्मा लागू

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची अपेक्षा आहे. अशातच सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 हजार रुपयांचा हप्ता जमा करणार की, फक्त सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा करणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button