Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

ज्ञान कधीही निराश होऊ देत नाही; राज मुच्छाल

शिक्षण विश्व: प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन गोपिसन अटायर अँड लाइफस्टाईल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज मुच्छाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा होते. यावेळी व्यासपीठावरती संस्थेचा खजिनदार भूपाली शहा, डॉ . तेजल शहा, संचालक डॉ. सचिन बोरगावे विभाग प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनीष पाटणकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री मुच्छाल पुढे म्हणाले, आयुष्यात नैराश्य तेव्हा येते , जेव्हा आपल्यामध्येच कमतरता असते. यासाठी स्वतःत बदल घडवा. वेळेचे अपव्यय टाळा. ज्ञान आत्मसात करा. ध्येय बोली सकारात्मक ठेवा. संभाषण कौशल्य आत्मसात करा. भाषेवर प्रभूत्व मिळवा . मदत करा, परंतु त्याचे भांडवल करू नका. आव्हानांना सामोरे जावा. प्रसंगी तज्ञाची मदत घ्या व ध्येय निश्चिती कडे जाण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करा. असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा      :      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक सचिव डॉ दीपक शहा म्हणाले, विद्यार्थ्यांनो आभाशी जगात जगू नका. ध्येयपूर्तीचा ध्यास अंगीकारा. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहे ते कृतीरूपी सिद्ध करा. अवांतर वाचन करण्याचे आवाहन केले.

पी आय बी एम चे संचालक डॉ. सचिन बोरगावे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा . स्वयंशिस्त अंगीकारा. गुणाच्या मागे न जाता स्पर्धेत स्वतःला सिद्ध करा ,असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ . महिमा सिंह यांनी केले तर आभार प्रा जेसीका गोडेटी यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button