Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

संत साई विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात 

थोर शिक्षकांचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी दिला कृतज्ञतेचा संदेश

पिंपरी- चिंचवड : संत साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर, संचालिका सुनीता ढवळेश्वर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ढवळेश्वर यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्यासह सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसारख्या थोर शिक्षकांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“जो आयुष्यभर शिकतो आणि विद्यार्थ्यांकडूनही शिकण्यास मागेपुढे पाहत नाही, तोच खरा शिक्षक,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकी जीवनात भेटलेल्या प्रत्येक गुरुजनांविषयी कृतज्ञ राहावे, असा मौल्यवान संदेश त्यांनी दिला.

संस्थेच्या विश्वस्त पायल ढवळेश्वर यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. “काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने अक्षरे उमटवत शिक्षक हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देतात,” अशा शब्दांत त्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका मंजुषा वाळवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण परिसर शिक्षण, संस्कार आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारलेला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button