ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

प्रवाशी घेऊन जाणाऱ्या चालत्या एसटी बसला आग

बसमध्ये आग लागताच प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी तारांबळ

धाराशीव : आपण आगीच्या अनेक घटनाबद्दल ऐकतो वाचतो, पण आज एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चालत्या बसने पेट घेतला. ही घटना इतकी भीषण होती की क्षणात बसमधून आगीचे लोट आणि धूर निघू लागला. ही घटना धाराशीवमध्ये तुळजापूर- नळदुर्ग रोडवर घडली. तीर्थ बुद्रुकजवळ बसला अचानक आग लागली. क्षणात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या चालत्या एसटी बसने पेट घेतला.

बसमध्ये आग लागताच प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी तारांबळ उडाली. ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रवाशांना वेळीस बाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुढे तपास सुरू आहे ही घटना कशी घडली, काय तांत्रिक अडचण होती याविषयी तपास होईल.

हेही वाचा : स्वतंत्र अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयासाठी पाठपुरावा

नळदुर्गमध्ये घडलेली बस आगीची घटना नेमकी काय होती?

धाराशीवच्या नळदुर्गमध्ये एका चालत्या एसटी बसने अचानक पेट घेतला. धूर आणि आगीचे लोट बसमधून निघाले, पण प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रवाशांची सुरक्षितता कशी सुनिश्चित केली गेली?

बसचालकाने धूर दिसताच तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढले, ज्यामुळे सर्वजण सुरक्षित राहिले.

ही घटना कशामुळे घडली असावी?

प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, पण याचा तपास सध्या सुरू आहे.

आता पुढे काय कारवाई होणार आहे?

पोलिस आणि एसटी महामंडळ यंत्रणा आगीच्या कारणांचा तपास करत आहे, तसेच बसच्या देखभालीची तपासणी केली जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button