विद्यार्थ्यांनी गिरविले प्राचीन गणित पद्धतीचे धडे!
शिक्षण विश्व: एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वैदिक गणितावर कार्यशाळा
आळंदी : एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथे ‘इन्फिनिटी : द मॅथ्स क्लब’ व गणित विभागाच्या संयुक्त विद्यमाने वैदिक गणित : प्राचीन भारतीय गणिताची अद्भुत शक्ती” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस सेंट मिराज कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक डाॅ. दीपा कृष्णमूर्ती या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी वैदिक गणितातील विविध सूत्रे, त्यांचा उपयोग आणि आधुनिक गणितीय समस्यांवरील प्रभावी उपाय विद्यार्थ्यांपुढे सादर केला.
कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट वैदिक गणितातील पारंपरिक भारतीय पद्धतींचा अभ्यास करून त्या आधुनिक काळातील गणना सुलभ करण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे होते. पारंपरिक सूत्रांद्वारे गणनेचा वेग, अचूकता आणि मानसिक क्षमता कशी वाढवता येते, याचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच, विद्यार्थ्यांना भारतीय गणिताच्या समृद्ध वारशाची ओळख करून देण्याचा मुख्य हेतू होता.
हेही वाचा : महापालिकेच्या मोकळ्या आणि आरक्षित जागांमध्ये झुले व राईड्ससह मनोरंजनाची साधने लावण्यास बंदी..!
या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या विविध शाखांतील १०१ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सहभागींनी वैदिक गणितातील तंत्रज्ञानाच्या वापरातून गणित अधिक सोपं व रुचकर कसं होऊ शकतं याचा अनुभव घेतला.
कार्यशाळेचे आयोजन इन्फिनिटी क्लबचे समन्वयक प्रा. त्रुप्ती निगडकर , गणित विभागप्रमुख प्रा. प्रदीप पानसरे, सहयोगी अधिष्ठाता, विद्यार्थी कल्याण. डाॅ. सुनील महाजन , संचालक डाॅ. बी. बी. वाफरे आणि डाॅ. अक्षदा कुलकर्णी, उपसंचालक डाॅ. मानसी अॅटिट्यूड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया आणि उत्स्फूर्त सहभाग पाहता, भविष्यात अशा उपक्रमांची मालिका राबवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.





