गोपाळकाला आणि दहीहंडीच्या उत्सवात विद्यार्थी झाले चिंब!
शिक्षण विश्व: थेरगाव येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतीय परंपरांचा गौरव

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
थेरगाव येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव पारंपरिक उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. शाळेमध्ये पारंपरिक व सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देत विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खास आयोजन करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनीही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दहीहंडीच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सुंदर सांस्कृतिक नृत्य सादर केली. बालचमूंनी आपल्या निरागस सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली, तर मोठ्या वर्गांतील विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
हेही वाचा : युवकांनो, विकसित भारताच्या ध्येयासाठी पुढाकार घ्या – कक्कड
संस्थेचे अध्यक्ष विजय पवार, सचिव अशोक मोरे, उपाध्यक्ष निलेश पालघर, खजिनदार सुरेखा पवार, नैना माने , मुख्याध्यापिका विद्या नायगाव , शशिकांत इंगवले, विलास शेलार, रमेश पाटील, विनायक पवार, संध्या पवार, महादेव जमादार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाच्या मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे दहावीतील विद्यार्थ्यांनी लावलेले तीन मनोऱ्यांचे थर ठरले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि साहसाचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन क्रीडा शिक्षक यशवंत माने, विजय माने, रजनीकांत गोरे, वैभव हडप, आणि जयेश लखन यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार करत कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेतली गेली.




