पिंपरी-चिंचवडसह परिसरात गणेशोत्सवाची तयारी जोरात!
मूर्तीकार संजय कुंभार यांच्या 'वेदांत आर्ट्स'च्या बाप्पांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | गणेशोत्सवाची चाहूल लागताच घराघरात आनंदाचे वातावरण पसरू लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपरी-चिंचवडमधील वडमुखवाडी, चऱ्होली परिसरात वेदांत आर्ट्स कार्यशाळेत बनणाऱ्या श्री गणेशमूर्तींना गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या कार्यशाळेचे मूर्तीकार संजय कुंभार हे गेल्या अनेक वर्षांपासून सुबक, आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करत आहेत. त्यांच्या मूर्तींना स्थानिक ग्राहकांसह दूरवरूनही मागणी असते.

संजय कुंभार म्हणाले, “गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भक्तांचा बाप्पावर असलेला विश्वास आणि प्रेम आम्हालाही मूर्ती घडवताना अधिक प्रेरणा देतो. आम्ही यंदाही विविध आकार आणि रंगसंगतींमध्ये आकर्षक मूर्ती तयार केल्या आहेत.”
हेही वाचा : संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा; राहुल, प्रियंका, राऊतांसह अनेक खासदार ताब्यात
‘लवकर बुकिंग करा’चा संदेश
वर्षानुवर्षे सातत्याने उत्तम कलाकृती सादर करणाऱ्या संजय कुंभार यांच्या मूर्तींसाठी आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांना त्यांच्या आवडत्या बाप्पाची मूर्ती वेळेत मिळवण्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सजावटीपासून ते बाप्पांच्या भावमुद्रांपर्यंत प्रत्येक मूर्तीमध्ये कलाकारांची मेहनत आणि भक्तिभाव स्पष्ट दिसून येतो. अधिक माहितीसाठी 9096646401 आणि 9595046571 या क्रमांकावर संपर्क करावा. गणेशोत्सव जसजसा जवळ येतो आहे, तसतसे वेदांत आर्ट्स कार्यशाळेतील गडगडाट वाढत चालला आहे. मूर्तीकार संजय कुंभार यांचे कार्य पुन्हा एकदा गणेशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाले आहे.
गणेशमूर्ती बनवणं ही फक्त एक व्यवसायाची गोष्ट नाही; ती माझ्यासाठी एक साधना आहे. प्रत्येक मूर्ती घडवताना मी केवळ माती घडवत नाही, तर त्यात भक्तांचा विश्वास, श्रद्धा आणि बाप्पावरचं प्रेम मिसळत असतो. लहानपणापासून माझं बाप्पाशी एक अनोखं नातं जुळलेलं आहे. त्याच नात्याचं प्रतीक म्हणजे ही मूर्ती. दरवर्षी मी जसा बाप्पाला घडवतो, तसाच तोही मला घडवत असतो — अधिक संयमी, अधिक कल्पक, आणि अधिक जबाबदार बनवत असतो.
– संजय कुंभार, मूर्तीकार.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा







