Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्ता रुंदीकरण विरोधात माण परिसरातील ग्रामस्थ आक्रमक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणा

रस्ता रुंदीकरण विरोधात ठराव देखील पारित

पिंपरी | आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांनी भल्या पहाटे दौरे करत, आयटी पार्क परिसरातील रस्ते रुंदीकरण करण्याचे कठोर निर्णय घेतले. मात्र अजित पवारांच्या निर्णया विरोधात आता माण ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी ठराव पारित केला आहे.

आयटी पार्क हिजवडी पाठोपाठ आता आयटी पार्क परिसरातील माण ग्रामपंचायत ने देखील उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या रस्ता रुंदीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध केला जात आहे. आयटी पार्क परिसरातील रस्ते रुंदीकरणाला विरोध नाही. मात्र आमच्या गावातील गावठाणाचे रस्ते हे फक्त २४ मीटर रुंद करण्यात यावे व गावठाणा बाहेरील रस्ते ३६ मीटर रुंदीचे करण्यात यावे; अशी मागणी माण ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा     :        पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या अग्निशमन केंद्रांची उभारणी वेगात

ग्रामस्थांवर केला जातोय अन्याय

एकीकडे हिंजवडी फेज वन ते फेज थ्री असा ३६ मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. तर दुसरीकडे त्याच ३६ मीटर रुंदीच्या उड्डाण पुलाखालील रस्ता देखील ३६ मीटर रुंद करून राज्य सरकार आयटी पार्क परिसरातील ग्रामस्थांवर अन्याय करत आहे; असा दावा माण ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी केला आहे. तसेच केवळ अभियंत्यांचेच म्हणणे विचारात घेतले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

तर न्यायालयात दाद मागणार

रस्ता रुंदीकरण करत असताना माण ग्रामपंचायत गावठाणातील मंदिर, शाळा, दुकान आणि नागरिकांचे घर बाधित होत आहेत. रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचा विचार प्रशासन जर करत नसेल तर शेवटी अजित पवारांच्या धोरणा विरोधात आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल अशा इशारा माण गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button