पिंपरी / चिंचवड

मनोज बोरसे सर यांचा दिल्ली दौरा सकारात्मक – सप्तर्षी फाउंडेशनचा दिव्यांग बांधवांच्या सेवांविषयी पाठपुरावा यशस्वी

पिंपरी | सप्तर्षी फाउंडेशन दिव्यांग बांधवांसाठी निरंतर सकारात्मक बदल आणण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्न संदर्भात 29 जुलै ते 01 ऑगस्ट 2025 दरम्यान यशस्वी नियोजन करण्यात आले.

सदर दौऱ्यात खालील सेवा तसेच योजनांविषयी यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात आले.

1) निरामय आरोग्य विमा योजना भेट दिलेले कार्यालय – नॅशनल ट्रस्ट , मेडीअसिस्ट टीपीए तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी.
प्रलंबित असलेल्या क्लेम मधील अन्यायकारक रिजेक्शन आणि क्वेरी बाबत सकारात्मक कृती 10 ऑगस्ट पर्यंत संबंधित यंत्रणेकडून करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच प्राथमिक कृती देखील सुरू केली आहे.

2) कायदेशीर पालकत्व :- भेट दिलेले कार्यालय – नॅशनल ट्रस्ट .
यासंदर्भात बहुतेक सर्व प्रक्रिया जिल्हास्तरावर करण्यात येते तरी देखील आवश्यकता असल्यास सहकार्य करण्याची इच्छा यंत्रणे कडून व्यक्त करण्यात आली.

3) यु. डी. आय. डी. ( वैश्विक दिव्यांग ओळखपत्र ) भेट दिलेले कार्यालय :- दिव्यांग सशक्तिकरण विभाग, भारत सरकार , दिल्ली
वैश्विक दिव्यांग ओळखपत्र विभागाचे संचालक श्री. विनीत सिंघल यांच्याशी यासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून आधार कार्ड आधारित व्यवस्था निर्माण करण्याची सप्तर्षी फाउंडेशनची जुनी मागणी टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास येत आहे. ऑगस्ट 2023 ला सप्तर्षी फाउंडेशनने यासंदर्भात प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला होता त्यावर अतिशय सकारात्मक कृती येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे.

दिव्यांग बांधवांना त्यांचे नाव , जन्मतारीख , पत्ता इत्यादी मध्ये दुरुस्ती करण्या संदर्भात सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात ऑगस्ट 2023 मध्ये सप्तर्षी फाउंडेशन कडून देण्यात आलेल्या निवेदनाबाबत देखील अंमलबजावणी यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे.

वैश्विक दिव्यांग ओळखपत्र कक्षाचे संचालक/प्रमुख श्री. विनीत सिंघल साहेब यांच्याशी मनोज बोरसे यांची सकारात्मक भेट.
वैश्विक दिव्यांग ओळखपत्र कक्षाचे संचालक/प्रमुख श्री. विनीत सिंघल साहेब यांच्याशी मनोज बोरसे यांची सकारात्मक भेट.

याव्यतिरिक्त दिव्यांग प्रमाणपत्र अपॉइंटमेंट सिस्टीम देखील पासपोर्ट अपॉइंटमेंट सिस्टीम प्रमाणे करण्यात यावी या जुन्या मागणीवर देखील सकारात्मक चर्चा होऊन झिरो पेंडन्सी असलेल्या जिल्ह्यातून पायलेट प्रोजेक्ट करण्याबाबत पडताळणी करण्यात येणार आहे. आज दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्व प्रमाणिकरणासाठी संबंधित यंत्रणेत अनेक वेळा चकरा मारावे लागतात तसेच हॉस्पिटल प्रशासनाला देखील त्यांच्या अपॉइंटमेंट देण्यासंदर्भात अडचणी येतात. अशावेळी पासपोर्ट अपॉइंटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम सारखी यंत्रणा देशात केंद्रीय पद्धतीने राबवल्यास दिव्यांग बांधव तसेच हॉस्पिटल यंत्रणा यांमध्ये योग्य समन्वय होऊन सर्वांचीच वेळ , उर्जा वाचेल. सदर प्रयत्न यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी करता येईल.

तसेच ज्या सदस्यांना वैश्विक दिव्यांग ओळखपत्र. ( UDID CARD ) शासनाकडून घरपोच मिळाले नाही किंवा हरवले आहे त्यांच्यासाठी रिप्रिंट म्हणजेच पुन्हा प्रिंटिंग करून घरपोच कार्ड मिळण्यासंदर्भात देखील पर्यायाचा विचार करण्यात येईल असे आश्वासन यंत्रणेकडून देण्यात आले आहे.

वैश्विक दिव्यांग ओळखपत्र याचा मूलभूत उद्देश एक देश , एक दिव्यांग , एक ओळखपत्र असा असून देखील अजून अनेक यंत्रणा आजही विविध सेवा देताना दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यासाठी जुन्या पद्धतीने कार्यवाही करत आहे , या संदर्भात केंद्रीय यंत्रणांकडून आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. यातील तांत्रिक बाबी पडताळून कार्यवाही करण्याचे आश्वासन यंत्रणेकडून देण्यात आले.
बेड रिडन ( अंथरुंगांला खेळून पडलेले) दिव्यांग बांधवांसंदर्भात दिव्यांग प्रमाणपत्र ची प्रक्रिया घरपोच करण्यासंदर्भात देखील या दौऱ्यात चर्चा झाली.

राष्ट्रीय न्यास – निरामय आरोग्य विमा योजना कक्षाचे प्रमुख तथा उपसंचालक श्री. राजेश सचदेवा सर यांच्यासोबत सकारात्मक भेट.

4) वन स्टॉप सोल्युशन दिव्यांग बांधवांचे सर्व प्रश्न एकच छताखाली सोडवण्याची क्षमता असलेला मनोज बोरसे सर यांचा ड्रीम प्रोजेक्ट वन स्टॉप सोल्युशन यासंदर्भात देखील श्री. विनीत सिंघल सर यांच्याशी सकारात्मक झाली असून पुढील मीटिंग विभागाचे सचिव श्री. राजेश अग्रवाल सर यांच्या सोबत करण्यात येईल.

5) दिव्यांग बांधवांना आणि कुटुंबीयांचा आरोग्य विमा दिव्यांग बालकांना व बांधवांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना इतर नागरिकांप्रमाणे आरोग्य विमा देण्यात अनेक अडथळे येतात. तरी दिव्यांग बालक अथवा बांधव असलेल्या कुटुंबीयांना देखील योग्य आरोग्य विमा मिळणे संदर्भात दिल्लीतील एका विमा कंपनीसोबत अतिशय सकारात्मक चर्चा होऊन 15 ऑगस्ट 2025 पर्यंत कृतीत आणण्याचा संकल्प करण्यात आला.

अशाप्रकारे दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक कृती व चर्चा होऊन मनोज बोरसे सरांचा दिल्ली दौरा दिव्यांग बांधव व कुटुंबियांसाठी आशेचा किरण निर्माण करणारा ठरला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button