Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांनी घेतला किचन गार्डनिंगचा अनुभव

शिक्षण विश्व: मास्टरमाइंड ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये किचन गार्डन ड्राईव्हचे आयोजन

पिंपरी चिंचवड :  मास्टरमाइंड ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ग्रीन कलर डे निमित्त किचन गार्डन ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

डॉ. प्रदीपा नायर यांनी विद्यार्थ्यांना किचन गार्डनिंगचे महत्त्व समजावून सांगितले आणि या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना ग्रीन ग्रो बॅग्स वितरित करून त्यांच्यामध्ये शाश्वत उपक्रमांबद्दलची आवड निर्माण केली.शाळेतील विज्ञान विषयाच्या शिक्षिका अमृता जाधव व अक्षता शिवाजी डावखर तसेच विविध विभागांतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून हा उपक्रम अधिक समृद्ध आणि सहयोगात्मक बनवला.

हेही वाचा –  भरदिवसा पिंपरी कॅम्पमध्ये गोळीबार: तरुणाच्या पायावर गोळी, परिसरात खळबळ

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना किचन गार्डन ड्राईव्हचे महत्त्वपूर्ण फायदे समजले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचा आनंद घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांना सुपीक व आरोग्यदायी आहाराची सवय लावणे. संघभावना व सहकार्याची जाणीव वाढवणे. जीवन कौशल्यांचा विकास, तणावमुक्ती व मानसिक स्वास्थ्य साधणे, सर्जनशीलता व जबाबदारीची भावना विकसित करणे. शैक्षणिक अभ्यासक्रमाशी जोडणी – विज्ञान, गणित आणि पर्यावरण अभ्यास या विषयांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच जीवन कौशल्यांचा विकास झाला, ज्यामुळे हा उपक्रम सर्वांसाठी अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरला असे मुख्याध्यापिका नायर यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button