Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जिल्ह्यात बेकायदा डोंगरफोडीची चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत कबुली

पुणे : कात्रज, कोंढवा, येवलेवाडीसह पानशेत रस्ता येथे अनधिकृत प्लाटिंग होत असून डोंगरफोडही करण्यात येत असल्याची कबुली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. डोंगरफोडीमुळे भूगर्भ जलस्तर, जैवविविधता, परिसरातील हवमान आणि लोकजीवनावर झालेल्या परिणामाचा अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बेकायदा डोंगरफोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्यासंदर्भातील मुद्दा भाजप आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार बापूसाहेब पठारे यांनी शुक्रवारी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. त्यासंदर्भात बोलताना बावनकुळे यांनी ही कबुली दिली.

खडकवासला, पानशेत रस्ता तसेच या परिसराती अन्य भागात अनधिकृत डोंगरफोड सुरू असून कोणत्याही परवानगीशिवाय खनिज उत्खनन, झाडांची तोड होत असून राडारोडा टाकण्यात आल्या असून तशा तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

‘शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथे अनधिकृत प्लाॅटिंग झाले असून त्या अनुषंगाने महसूल विभागाची बैठख झाली होती. या बैठकीमध्ये अनधिकृत उत्खननबाबात कायद्यातील तरतूदी तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी सूचना हवेलीच्या तहसीलदारांना करण्यात आली. तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात पुणे महापालिकेने तातडीने कारवाई करण्यासंदर्भातही आयुक्तांना सांगण्यात आले आहे,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा –  धर्मांतराचा मुद्दा: हिंदू मुलींवर अत्याचार झाला त्यावेळी का नाही बोलला?

ते म्हणाले, ‘पुणे पश्चिम वर्तुळाकार मार्गाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल या मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. मात्र डोंगरफोडीमुळे भूगर्भ जलस्तर, जैविविधता, परिसरातील हवामान आणि लोकजीवन यावर होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येणार आहे.

हा अहवाल राज्य पर्यावरणीय मूल्यांकन प्रभाव समितीला सादर करण्यात येईल.’ दरम्यान, अवैध गौण खनिज उत्खननाबाबत हवेलीच्या तहसीलदारांनी नऊ प्रकरणांमध्ये १६ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दंडाचा आदेश पारित केला आहे. त्या रकमेच्या वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरक्षित जागेवर तसेच डोंगरा माथा-डोंगर उताराच्या ठिकाणी अनधइकृत प्लाॅटिंग करून बांधकामे, गोदामे, रस्ते करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने अनधिकृत प्लाॅटिंग आणि बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार कोंढवा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button