Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूरात ३६ वर्ष सोबत राहिलेल्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Kolhapur : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभीमवर राज्यात बदलाचे वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षता इनकमिंग जोरदार होत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला गळती लागली आहे. अशातच कोल्हापूरातून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल ३६ सोबत राहिलेल्या शिवसैनिकाने ठाकरेंना पदाचा राजीनामा देत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून रवीकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर कोल्हापूरमधील ठाकरे गटात नाराजी नाट्य रंगले. दरम्यान, संजय पवार यांनी शिवसेना उपनेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संजय पवार यांनी इंगवले यांच्या नियुक्तीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पदाचा राजीनामा दिला असला तरी ते उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून कार्य करत राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक ! कल्याणमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का

जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवलं, ३६ वर्षे शिवसैनिक म्हणून काम केलं. पदाचा राजीनामा दिला  असला तरी मी हनुमान म्हणून आयुष्यभर उद्धव ठाकरे यांच्या पायाजवळ कायम राहणार आहे. मी शिंदे गटात जाणार अशी अफवा पसरवण्यात आली. पण मी कुठंही जाणार नाही. तसेच आपण १९९० पासून शिवसैनिक म्हणून पक्षात काम केलंय. गेली ३६ वर्षे मी एकनिष्ठपणे काम केलं. मातोश्रीवरून जे आदेश येतील, त्याचे तंतोतंत पालन केलं.

पण गेली १० वर्षे बघितलं तर काही वेगळं घडत गेलं. निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासायला हवी. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अनेक होते, पण, नियुक्ती करताना उपनेत्याला देखील माहिती नसेल तर काय करायचं. त्यामुळे मी शिवसेना उपनेतेपदाचा मी राजीनामा देत आहे. एक शिवसैनिक म्हणून मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button