Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

शिक्षण विश्व: व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये काव्यवाचनाचा उत्सव

महाकवी कालिदास दिन व संस्कृत दिनानिमित्त कार्यक्रम

पिंपरी | महाकवी कालिदास दिन व संस्कृत दिनानिमित्त व्ही. के. माटे हायस्कूल, श्रीधरनगर, चिंचवड येथे एक भव्य काव्यवाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चंद्रकिरण काव्य मंडळ, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोरया शिक्षण संस्थेचे तहयात विश्वस्त व खजिनदार श्री. रणजीत सावंत, कार्यकारिणी सदस्या व सुप्रसिद्ध कवयित्री सौ. प्रतिभाताई कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह व प्राचार्या मान. सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर होत्या.

या काव्यवाचन सोहळ्यात चंद्रकिरण काव्य मंडळाचे ज्येष्ठ कवी व कवयित्री – सौ. मेघा खळदे, सौ. ज्योती मुंगी, सौ. मीनाक्षी भरड, श्री. सतीश साठे आणि श्री. जयवंत पवार – यांनी विविध सामाजिक विषयांवरील कविता तसेच क्रांतिकारकांवरील स्फूर्तिदायक रचना सादर करून रसिकांची मनं जिंकली. पोखरण अणुचाचणीवर आधारित पोवाड्याने उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमान जागवला.

हेही वाचा     :      PMRDA | नागरी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने नियोजन करा!

Poetry Recitation Festival at V. K. Mate High School

विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही आपल्या स्वरचित कविता सादर करून आपली काव्यप्रतिभा सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत सौ. पुजारी मॅडम यांनी, सूत्रसंचालन श्री. हनुमंत हुचगोळ सरांनी तर आभारप्रदर्शन श्री. गिरी गोसावी सरांनी केले.

या कार्यक्रमास मोरया शिक्षण संस्थेचे उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांनी विद्यार्थ्यांच्या कविता सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. “या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन उद्याचे महाकवी घडतील,” असे त्यांनी अभिमानपूर्वक सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button