Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

To The Point | आमदार लांडगे ‘ऑन फायर मोड’; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात निव्‍वळ ‘रडगाणे’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘रडगाणे’ सावरता आले नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटांत प्रश्न निकालात काढला

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली TP Scheme च्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षप्रवेश कार्यक्रम स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी रडगाणे मांडले. मात्र, प्रश्न सुटला नाही. याउलट, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटांत हा प्रश्न सोडवला. TP Scheme रद्द करण्याची घोषणा केली आणि आयुक्त शेखर सिंह यांना तशी कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भोसरीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. माजी नगरसेवक अजित गव्हाणेंसह 37 माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच सरकारमध्ये सहभागी होत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रमाचे व्यासपीठ ‘शेअर’ करायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, 37 माजी नगरसेवक आणि संबंधित पक्ष पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. उपमुख्यमंत्री पवार यांनी या कार्यक्रमात सहभागी होणे टाळले.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात माजी आमदार विलास लांडे आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आपल्या भाषणांमध्ये चऱ्होलीतील प्रस्तावित टीपी स्कीमबाबत आक्षेप नोंदवले. किंबहुना, अजित पवार यांनी याबाबत लक्ष घालावे आणि भूमिपुत्रांना न्याय दावा, अशा आशयाची मागणी केली. पण, पवार यांनी या मुद्यावर तोडगा काढला नाही.

हेही वाचा    :    फैसला ऑन दी स्पॉट : मौजे चऱ्होली येथील प्रस्तावित TP Scheme रद्द!

दुसऱ्याच दिवशी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चिखलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात लांडगे यांनी चऱ्होली TP Scheme बाबत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असून, राजकीय संधीसाधुपणा काहीजण करीत आहेत, याकडे लक्ष वेधले. यावर सकारात्मक भूमिका घेत फडणवीसांनी एका मिनिटांत TP Scheme रद्द करण्याची घोषणा केली आणि कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीचा कार्यक्रमात सत्तेत असतानाही शहरातील विकासाच्या मुद्यांवर फक्त रडगाणे दिसले आणि महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपाचे वर्चस्व आणि फैसला ऑन दी स्पॉट दिसला, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

महेश लांडगे यांनी विरोधकांचे वाभाडे काढले..!

राज्यात भाजपा महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित गव्हाणे आणि 37 माजी नगरसेवक स्वगृही परतले. त्या कार्यक्रमात लांडे-गव्हाणे यांनी आमदार लांडगे यांना लक्ष्य केले. याचा वचपा लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढला. या शहराच्या विकासात सर्वांचे श्रेय आणि आमचेही आहे. 2017 नंतर भाजपाच्या सत्ताकाळात शहरातील प्रश्न सुटले. विकासकामे झाली, ती मान्य करावी लागतील. पण,‘‘ काही लोकांचे विस्मरण होत आहे. TP आणि DP बाबत नॉलेज देणाऱ्यांना अमेरिकेत तज्ञ म्हणून पाठवले पाहिजे. त्यांच्या विकसित मेंदूचे प्रदर्शन केले पाहिजे. काहीजण बावचाळलेला प्राणीसारखे करीत आहेत. संतपीठासारख्या वास्तुवर राजकीय स्वार्थाने आरोप केले’’ असा घणाघात महेश लांडगे यांनी केला. तसेच, शहरात पॉडकास्ट करुन नॉलेज देणाऱ्यांना आयएसएस आणि आयपीएस म्हणून बसवले पाहिजे… अशा शब्दांत वाभाडे काढले आहेत. तसेच, विकासकामांचे श्रेय घेणाऱ्यांसाठी कामाची निविदा काढलेली तारीख आणि काम पूर्ण झालेली तारीखसुद्धा प्रशासनाचे प्रसिद्ध करावी, अशी सूचना आयुक्त शेखर सिंह यांना करीत आमदार महेश लांडगे यांनी राजकीय विरोधकांवर शरसंधान केले आहे.

अजितदादांविरोधात थोपाटले दंड…

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. याच वादातून आता भाजपचे भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. “मी पैलवान आहे, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे”, असे सांगत महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांविरोधात शड्डू ठोकला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने पिंपरी-चिंचवडचा विकास केला. पण या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतो, असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे आता यावरुन पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. पिंपरी पिंपरी शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. आता दिव्यांग भवन कोणी उभारले. याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी होती. २०१७ ला महापालिकेत भाजपची सत्ता आली, त्यानंतर हे दिव्यांग भवन यासंह अनेक विकास कामे झालीत. त्यामुळं या शहराच्या विकासात आमचं ही योगदान आहे. इतरांचे योगदान आम्ही नाकारत नाहीच. मात्र, बऱ्याच जणांचे योगदान आम्ही नाकारत नाही. शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर काय केलं असतं? घंटा….. म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का? आता गेली ३० वर्षे काय केलं असं जे जे येऊन सांगतायत, ते आम्ही कुठं नाकारत आहोत. तुम्ही केलं की पण आम्ही पण २०१७ पासून विकास केलेला आहेच ना? हे कसं काय नाकारता, असे महेश लांडगे यांनी म्हटले. आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं की कामं. आम्ही इथं पारदर्शक काम करत आहोत. खासदार आप्पा बरोबर आहे का? जे चांगलं ते चांगलं, मी कोणाला घाबरत नाही. पैलवान आहे, सर्वांना अंगावर घ्यायची सवय आहे. स्पष्ट सांगताना माझा पाऊल डगमगणार नाही. देवेंद्रभाऊ करुन जातो आम्ही, नाव दुसऱ्याचं लागतं. जरा माझं पण नाव कुठं तरी लिहावं. आयुक्तांना प्रोटोकॉल मध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button