Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील नातसूनेच्या हाती कमळ; फडणवीसांच्या उपस्थित होणार भाजपमध्ये प्रवेश

Jayashree Patil :  माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजकारणात भाजपला बळ मिळाले आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. तर खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जाऊनभेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा प्रवेश होणार आहे.

हेही वाचा – राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज जयश्री यांनी भाजपात प्रवेश करत कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button