Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इरफानने आईला दिलेला निरोप ठरला अखेरचा!

अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू

कुटुंबीय, शेजारी, मित्रपरिवार सुन्न!

पिंपरी चिंचवड :  “आई, मी फ्लाइटवर जातोय… काळजी करू नकोस” तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी पुन्हा फोन करतो… पिंपरीतील इरफान शेखचा आणि त्याच्या आईचा हा नेहमीचा संवाद. मात्र हा संवाद यावेळी अखेरचा ठरला.

पिंपरीच्या संत तुकाराम नगर परिसरातील रहिवासी इरफान शेख (वय २२) गेल्या दोन वर्षांपासून विमान कंपनीत केबिन क्रू म्हणून कार्यरत होता. कामाचा एक भाग म्हणून तो देशभर फ्लाइट्समध्ये प्रवास करायचा. कोणतीही फ्लाइट असो, तो आईला आधी कळवायचा कोणता मार्ग, कोणती वेळ, कुठे उतरणार… असा त्यांचा संवाद ठरलेला असायचा. यावेळी इरफानचा नाही तर प्लेन क्रॅश झालेली बातमी आईला ऐकायला मिळाली आणि आईने एकच हंबरडा फोडला. शेजारी, मित्रपरिवार देखील या बातमीने सुन्न झाले आहेत.

अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातात इरफानचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. ही बातमी समजताच त्याच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. “माझा इरफान त्या फ्लाइटमध्ये होता!” असे त्या एकसारख्या बडबडत होत्या. इरफानच्‍या मृत्‍यूची बातमी समजताच संत तुकारामनगरमध्ये शोककळा पसरली.

हेही वाचा –  वक्तव्यासाठी आधार घेतलेल्या पुस्तकाची राहुल गांधी यांच्याकडे मागणी; म्हणणे मांडण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी भावाचे डीएनए सँपल

इरफानचे आई-वडील आता अहमदाबादला पोहोचले आहेत. अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात आले. इरफानच्या भावाचा सॅम्पल घेण्यात आला असून, तो जुळल्यावरच मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती इरफानचे काका फिरोज शेख यांनी दिली.

बकरी ईदसाठी आला होता पिंपरीत

इरफान काही दिवसांपूर्वीच बकरी ईदसाठी तीन दिवसांची सुट्टी काढून घरी आला होता. घरात हसणं, खेळणं, आईसोबतचे गप्पाटप्पा अजूनही घरच्यांच्या डोळ्यासमोर आहेत. पण त्यानंतर तो परत निघून गेला. आता तर तो आमच्यातून कायमचा निघून गेला आहे ही बातमी मनाला पटणार नाही. असे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. इरफानचे मित्र, शेजारी, नातेवाईक अजूनही धक्क्यात आहेत. फोनवरच्या शेवटच्या बोलण्याच्या आठवणी, त्याचे फोटो, आणि “आई, मी परत येतो…” हे त्याचे शब्द आता काळजात खोलवर घर करून राहिले आहेत. असे त्याचे कुटुंबीय सांगत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button