नो कॅश, नो पेट्रोल ! आजपासून पेट्रोल पंपावर UPI आणि कार्ड पेमेंट बंद; नेमकं कारण काय?

Petrol Pump UPI Ban : सर्वसामान्य नागरिकांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. आजपासून (10 मे) पेट्रोल पंपावर यूपीआय पेमेंट करता येणार आहे. सध्या ऑनलाइन पेमेंट करण्यास अनेकजण पसंती देतात. सोईस्कररित्या होणाऱ्या ऑनलाइन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसरीकडे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप मालकांनी UPI आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन पैसे न स्वीकारण्याची घोषणा केली आहे.
टीओआयच्या अहवालानुसार, पेट्रोल पंपावर केवळ यूपीआयद्वारे पेमेंट स्वीकारणे थांबवणार नाहीत, तर 10 मे पासून कार्ड पेमेंट स्वीकारणे देखील बंद करण्याचा इशारा दिला आहे. डिजिटल पेमेंटद्वारे वाढत्या सायबर फसवणुकीमुळे देशातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंप मालकांनी डिजिटल माध्यमातून पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मंत्री दीपक केसरकरांची निवृत्तीची घोषणा; राजकीय वारसदार कोण?
त्यानुसार आता विदर्भ, नाशिकमध्ये तुम्ही ऑनलाइन पेमेंट करु शकणार नाहीत. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने म्हटले की, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. फसवणूक करणारे ग्राहकांचे कार्ड किंवा नेट बँकिंग हॅक करतात आणि त्याचा वापर करून पैसे भरतात.
यानंतर तक्रार करतात आणि व्यवहार रद्द करतात. अशा सायबर फसवणुकीमुळे अनेक पेट्रोल पंप मालकांचे खाते पूर्णपणे ब्लॉक करण्यात आहे. यामुळे पेट्रोल पंप मालकांने खूप नुकसान झाले आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशननेही अशीच घोषणा केली आहे. नागपूरमधीलही काही पेट्रोल पंप मालकांनी १० मेपासून डिजिटल पेमेंट न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सरकारला याबद्दल माहिती देण्यात आल्याचे सांगितले आहे. पेट्रोल पंप मालक आता योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यावरच डिजिटल पेमेंट सुरू करतील, असेही सांगण्यात आले आहे.





