breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
प्राधिकरणाने संपादीत केलेल्या जमिनीचा मालकी हक्क नागरिकांना द्या
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील आरक्षित जागा विकत घेऊन काही एजंटांनी नागरिकांची फसवणूक केली आहे. परंतु, त्या जागा प्राधिकरणाने संपादीत केल्यामुळे संबंधित नागरिकांना त्या जागेचा मालकी हक्क प्राप्त झालेला नाही. तरी, प्राधिकरणाने तीन गुंठ्यापर्यंतच्या जागेचा हक्क नागरिकांना द्यावा. याबाबतचा ठराव प्राधिकरणाच्या येत्या सभेत मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. तसे, निवेदन त्यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना दिले आहे. यावेळी महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी, नगरसेवक नामदेव ढाके, बाबू नायर आदी उपस्थित होते.