Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सहा वर्षाच्या बालिकेला मारहाण; शिक्षकाविरोधात पोलिसांत गुन्हा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – अभ्यास केला नाही म्हणून युकेजीच्या वर्गात शिकत असलेल्या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने मारहाण केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी मुलीचे पालक कोमल दीपक पवार (वय 25) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांची मुलगी देविका पिंपळे सौदागर येथील लक्ष्मीनगरच्या अभिलाषा फेरीटल स्कुलमध्ये शिकते. देविकाला अभ्यास केला नाही, म्हणून शिक्षकाने गालावर चापट मारली. हातातील प्लास्टिक पट्टीने पायावर मारले. दुखापत झाली. केअर ऑफ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन या कायद्यानुसार शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button