‘हुनर-2025’मधून विद्यार्थ्यांनी घडविले कलागुणांचे दर्शन
एज्युकेशन कॅम्पस: गायत्री स्कूल मधील कौतुकास्पद उपक्रम

पिंपरी-चिंचवड | प्रजासत्ताक दिनानिमित्त गायत्री इंग्लिश मिडियम स्कुल व ज्युनिअर काॅलेज मोशी या शाळेने आयोजित केलेल्या हुनर 2025 या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे दर्शन घडविले.
गायत्री स्कूलच्या वतीने’ हुनर-2025′ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातून विद्यार्थांचे कला प्रदर्शन तसेच ध्वजवंदनाच्या दिवशी शालेय मुलांचे विविध गुणदर्शन व साहसी खेळांचे सादरीकरण झाले. या प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कविता भोंगाळे कडू यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनासाठी कला शिक्षक उदय ठुबे व सोमनाथ वायदंडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी सर्वांना या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
हेही वाचा : स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, कलात्मकतेस चालना देणारे व्यासपीठ; डॉ. बी. बी. वाफरे

‘हुनर-2025 ‘या भव्य कला प्रदर्शनात 1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृती व हस्तकला प्रदर्शनात सादर केल्या. त्यामध्ये ड्राॅईंग, 2D,3D,वर्क तसेच आर्ट अॅन्ड क्राप्ट, फोकआर्ट, वारली पेंटींग,मंडला आर्ट, वेस्ट टु बेस्ट,विविध किल्ले प्रतिकृती ,स्टोन डिझाईन,बाॅटल डेकोरेशन वर्क विद्यार्थ्यांनी सादर केल्या.रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन कला प्रदर्शनाचा आनंद लुटत विद्यार्थ्यांच्या कला गुणांची स्तुती केली. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्मिती झाली. सर्व विभागाचे प्राचार्य ,शालेय प्रशासन ,शिक्षक विद्यार्थी यांनी सहकार्य केले.





