Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनपाच्या स्कूल बसमध्येही आता मदतनीस

पुणे :  महापालिका प्राथमिक विभागाकडील विद्यानिकेतन व क्रिडानिकेतन शाळेतील विद्यार्थी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने नविन शासन धोरणानुसार महापालिकेच्या शाळांसाठी असलेल्या स्कूल बसमध्ये आता महिला मदतनीस नेमल्या जाणार आहेत. त्यासाठी, महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे.

पुढील काही दिवसांत हे मदतनीस नेमले जाणार आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्कूलबस चालकांकडून मुली तसेच लहान मुलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विद्यार्थी बस वाहतुकीचे नवीन शासन धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, या मदतनीस नेमल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.

हेही वाचा –  सैफ अली खानवरील हल्याबाबत मंत्री नितेश राणे यांचे यांचे मोठे विधान

शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या विद्यानिकेतन व क्रीडानिकेत शाळेतील विद्यार्थी वाहतुकीसाठी पुणे परिवहन महामंडळ पीएमपी यांच्याकडून बसेस पुरविण्यात येतात. मनपा शाळेतील विद्यार्थी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन शासन धोरणानुसार विद्यार्थी वाहतूक बसमध्ये मुली (विद्यार्थिनी) असतील तर महिला सुरक्षा मदतनीस नेमणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार परिवहन महामंडळाने बसेमध्ये सुरक्षा मतदनीस पुरविणे बाबत शिक्षण विभागानकडे मागणी केलेली होती. एकूण ४८ बसेसद्वारे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची (मुले व मुली ) वाहतूक करण्यात येते. ही बाब विचारात घेऊन विद्यार्थी वाहतूक बसेसमध्ये महिला सुरक्षा मदतनीस यांची नेमणूक करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button