शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारण्याच्या कामांना वेग
छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होणार
जुने नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारण्याच्या कामांना वेग आला आहे. याहीवर्षी मूर्तीकारांकडून महाराजांची अर्धाकृती, पूर्णाकृती तसेच सिंहासन, शिवमुद्रा अशा विविध प्रकारात मूर्ती साकारण्यात मूर्तिकार मग्न झाले आहे. चालू वर्षी मूर्तींच्या दरांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचे मूर्तीकारांकडून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होणार आहे.
सार्वजनिक मंडळाकडून विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे. सर्वप्रथम त्यांच्याकडून महाराजांची मूर्ती साकारण्याचे काम मूर्तीकारांना देण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळ तसेच घरगुती लहान मंडळांकडून महाराजांच्या मूर्तीस मागणी असल्याने शहराच्या विविध भागात मूर्ती साकारण्याचे काम मूर्तीकारांनी हाती घेतले आहे. सध्या दिवस-रात्र मूर्ती साकारण्याचे काम सुरू असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात आले.
यंदा शिवमुद्रेवरील मूर्ती देखील विक्रीस आली आहे. शिवमुद्रा, सिंहासन विराजमान आणि अर्धाकृती महाराजांच्या मूर्तीस अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. गोदाकाठ भागात अशाच प्रकारच्या मुर्ती साकारण्याचे काम जोरदार सुरू आहे. सिंहासन विराजमान, शिवमुद्रा, अर्धाकृती, पूर्णाकृती, राजेशाही बैठक अशा विविध प्रकारांत मुर्त्या साकारल्या जात आहे. आत्तापासूनच मूर्तींना मागणी होऊ लागली आहे.
”शिवजयंतीनिमित्ताने महाराजांच्या मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. या वर्षी दरात कुठलीही वाढ झालेली नाही. पन्नास रुपयापासून तर पंधरा हजारापर्यंत मूर्तींचे दर आहे. यावेळी पाच प्रकारात मूर्ती साकारल्या जात आहे.”- संदीप मोरे, मूर्तीकार
असे आहे दर
मूर्ती……………………..दर
शिवमुद्रा मूर्ती…………………१ हजार ५००
सिंहासन विराजमान………………५ हजार
पूर्णाकृती मोठी…………………१५ ते २० हजार
पूर्णाकृती लहान…………………९००
अर्धाकृती…………………….२०० ते ४ हजार
राजेशाही बैठक……………..२०० ते ३ हजार ५०





