Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जितेंद्र आव्हाड म्हणतात… सैफवरील हल्ल्यात मुलाचाच बळी जाणार होता!

प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला : जितेंद्र आव्हाड

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूहल्ला केला. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले असून त्यापैकी दोन जखमा गंभीर होत्या. दरम्यान, सैफ अली खानवर गुरुवारी लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला अतिदक्षता विभागातून विशेष विभागात हालवण्यात आले आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत एक खळबळजनक दावा केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधअये त्यांनी म्हटलं आहे की, प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर त्याच्या मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले.

हेही वाचा : ‘दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध’; उपमुख्यमंत्री अजित पवार 

https://x.com/Awhadspeaks/status/1880289161812341081

महाईन्यूज-X फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

 

तैमूरचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच : जितेंद्र आव्हाड

कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले. सैफ व करीनाचा मुलगा तैमूर हा समाजमाध्यमांमध्ये व जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून, प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरबी भाषेत चांगला अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ असा तैमूरचा अर्थ आहे. त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव ‘तैमूर’ असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचं लक्ष्य बनला होता. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button