Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापालिकेची सहा रुग्णालयांना नोटीस; तपासणीत आढळल्या त्रुटी

पुणे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील रुग्णालयांची तपासणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. या तपासणीस दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का याची तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेदरम्यान सहा रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळून आल्याने. या प्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना नोटीस बजावली.

पुणे शहरात काही ठिकाणी कोणतीही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार केल्याची माहिती समोर आली होती. तसेच महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ लाटण्यासाठी बनावट रुग्णांची नावे दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहिम कडक केली आहे. यासोबतच शहराच्या कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालये यांना दि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट १९४९ मधील तरतुदीनुसार महापालिकेकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील रुग्णालयांच्या तपासणीसाठी गुरुवार पासून खास ड्राईव्ह घेतला जाणार आहे. पुणे पालिकेकडून महाराष्ट्र शुश्रूषागृहे नोंदणी नियम २०२१ शासन अधिसूचनेनुसार नर्सिंग होमची वर्षातून दोन वेळा म्हणजेच दर सहा महिन्यातून एकदा तपासणी करण्यात येते. याकरिता तपासणी सूची तयार केलेली आहे.

हेही वाचा    –        एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन मोबाईलवर कळणार 

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या तपासणी पथकामार्फत शहरातील रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. शहरात सुमारे ८५० रुग्णालये आहेत तर ४ हजार पेक्षा जास्त बाह्य रुग्ण विभाग आहेत. राज्य शासनाच्या आदेशाने आरोग्य विभागाने आता ही तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे त्रुटी अथवा दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे. असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

तपासणी दरम्यान अग्निशामक यंत्रणा आहे का, नमुना ड प्रमाणे रुग्णांचा तपशील ठेवला जातो का याचीही तपासणी केली जाते. तपासणी करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालयस्तरावर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी करतेवेळी आढळून आलेल्या त्रुटीबाबत संबंधिताना तोंडी अथवा लेखी सूचना करण्यात येतात. महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियमांतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांनी दिलेल्या सूचना व आदेशानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी विशेष मोहीम (स्पेशल ड्राईव्ह) राबविण्यात येणार आहे. विनापरवाना आढळून आले तर कारवाई केली जाईल. महिनाभर हे अभियान सुरू राहणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी विशेष मोहीम सुरु केली आहे. वर्षातून दोन वेळा अशी तपासणी केली  जाते. नोटीसवर कारवाई नाही केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल. बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट नुसार कारवाई केली जाईल. रुग्णालयांना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.

 – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी,   आरोग्य विभाग, पुणे महापालिका.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button