
मुंबई : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविक, श्रद्धाळू आणि देश-विदेशातून पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या वेगळेपणामुळे अनेक साधु, संत, महंत लक्ष वेधून घेत आहेत. कुणी कठोर तपश्चर्येमुळे तर कुणी वेगळ्या वेशभुषेमुळे, तर कुणी शिक्षणामुळे चर्चेत आहेत. यातच आता कबुतरबाबांची भर पडली आहे. गेल्या ९ वर्षांपासून एक कबुतर या बाबाच्या डोक्यावर घरटं करून आहे. या कबुतरबाबाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महंत राजापुरी महाराज असं या कबुतर बाबाचं नाव आहे. ते राजस्थानच्या चित्तोडगढचे असून जूना आखाड्याच महंत आहेत. गल्या नऊ वर्षांपासून एक कबुतर त्यांच्या डोक्यावर घरटं करून आहे. ते जिथे जातात, हे कुबतरही त्यांच्याबरोबर जातं.
हेच कुबतर सध्या त्यांची ओळखं बनली आहे. सध्या कुंभमेळ्यात ‘कबुतरबाबा’ आकर्षणांचं केंद्र ठरले आहेत. अनेक भाविक त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. प्राणीसेवा हाच मोठा धर्म असल्याचं या बाबाचं म्हणणं आहे. ते एकप्रकारे प्राणीसेवा करण्याचा संदेश देत आहेत. प्राणी आणि पक्षांप्रती असलेलं त्यांचं प्रेम अनेकांनी प्रेरणादायी ठरते आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालीय. पौष पौर्णिमेचं पहिलं स्नान पार पडलंय. ४५ दिवस हा महाकुंभ मेळा चालणार आहे.या महाकुंभ मेळ्यात अनेक साधूंनी कठोर अशी तपश्चर्या केलीय. अनोखे आणि वेगळे प्रण त्यांनी केले आहेत. महाकुंभ मेळ्यात संन्यासी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. यात गाड्यांचे शौकिन असलेलेही काही बाबा आहेत.
कबुतरबाबांबरोबर बुलेट बाबा आणि हार्ले डेविडसन गाडीवरून आलेल्या बाबांचीही चर्चा आहे. त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हार्ले डेविडसन बाईकवरून कुंभमेळ्यात फेरफटका मारत असलेल्या या बाबांचे फोटो समोर आले आहेत. आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात तब्बल ६० लाख भाविकांनी गंगेत स्नान केलं आहे. परदेशी भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.




