Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, ८ महिन्याच्या बाळाला लागण

HMPV Virus | चीनमध्ये थैमान घालणारा HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ८ महिन्यांच्या चिमुकलीला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. बंगळुरुतल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

बंगळुरुतल्या आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसने ग्रासलं आहे. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही. दरम्यान या घटनेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. ‘घाबरू नका, पण सावध राहा’, असा आरोग्य विभागाने नागरिकांना सल्ला दिला आहे.

हेही वाचा     –      पुणे बुद्धिमान लोकांचं शहर; मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

HMPV व्हायरसची लक्षणे काय?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.

मास्क लावण्याचं आवाहन

लहान मुले आणि वृद्ध लोक, तसेच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेले आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. विषणूचा वाढता प्रभाव पाहाता, अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याची शिफारस केली असून, काही नवे नियम जारी केले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button