दिग्गज ओपनर मार्क वॉ ने भारतीय कर्णधाराबद्दल रोखठोक मत केले व्यक्त
"मी सिलेक्टर असतो, तर असच केलं असतं".
मेलबर्न : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सध्या त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील प्रदर्शनानंतर, तर त्याच्यावरील दबाव वाढू लागला आहे. मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत 0-3 असा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघर्ष सुरु आहे. मेलबर्न कसोटीच्या दोन्ही डावात रोहित शर्माला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या डावात फक्त 3 आणि दुसऱ्या डावात रोहित शर्मा अवघ्या 9 धावांवर बाद झाला. महत्त्वाच म्हणजे टीमला गरज असताना तो स्वस्तात बाद झाला. रोहितच्या बॅटमधून धावा आटल्या असून त्याच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मेलबर्न कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार का? अशी चर्चा आहे. सिडनी टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह कॅप्टनशिप करणार का? ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ओपनर मार्क वॉ ने म्हटलं की, मी सिलेक्टर असतो, तर असच केलं असतं.
मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी कॉमेंट्री करताना मार्क वॉ ने भारतीय कर्णधाराबद्दल रोखठोक मत व्यक्त केलं. रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्याच समर्थन केलं. एडिलेड टेस्टपासून टीम इंडियासोबत असलेल्या रोहित शर्माला विशेष चमकदार कामगिरी करता आलेली नाही. ब्रिसबेनमध्येही त्याची बॅट चालली नाही.
रोहितने या सीरीजमध्ये किती धावा केल्यात?
रोहितच हे प्रदर्शन पाहून त्याला टीममधून वगळण्याची तसेच निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला देण्यात येतोय. मार्क वॉ या सीरीजसाठी ऑस्ट्रेलियाई ब्रॉडकास्टर फॉक्स क्रिकेटसाठी कॉमेंट्री करतोय. “मी सिलेक्टर असतो आणि मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही धावा झाल्या नसत्या, तर सिडनीच्या तिसऱ्या निर्णायक कसोटीआधी मी, रोहितला त्याच्या आतापर्यंतच्या सेवेसाठी धन्यवाद म्हटलं असतं. रोहित तू महान खेळाडू आहेस पण सिडनी टेस्टसाठी आम्ही जसप्रीत बुमराहला कॅप्टन बनवतोय. तुझं करिअर इथेच संपतय” असं सांगितलं असतं, हे मार्क वॉ कॉमेंट्री करताना म्हणाला. रोहित शर्मावर आता प्रचंड दबाव आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 4 इनिंगमध्ये फक्त 22 धावा केल्या आहेत. तो फक्त 70 चेंडू क्रिजवर टिकून खेळू शकलाय.





