Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बीआरटी’तील घुसखोरी ३९ हजार चालकांना भोवली; ११ महिन्यांत ३ कोटी ७१ लाखाचा दंड वसूल

पिंपरी | शहरात गेल्या ११ महिन्यांत बीआरटी मार्गामध्ये घुसखोरी करणाऱ्या ३९ हजार ५०७ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या वाहनचालकांकडून तीन कोटी ७१ लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी मार्गाची आखणी करण्यात आली. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी खासगी वाहनचालकांकडून मागील काही काळापासून बीआरटी मार्गात सर्रास घुसखोरी सुरू आहे.

बीआरटी मार्ग रिकामा असल्याने आणि वाहनचालक भरधाव असल्याने अनेक अपघात घडले आहेत. त्यातच मागील दोन वर्षांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) बीआरटी मार्गातील वॉर्डन हटविले आहेत. त्यामुळे वाहनचालक बीआरटी मार्गात प्रवेश करत आहेत. आगामी काळातही बीआरटीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिला आहे.

हेही वाचा    –      सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना 

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांकडून ‘नो एण्ट्री’साठी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय वाहन परवाना नसणे, मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, आवश्यक कागदपत्रे न बाळगणे आणि जुनी दंडवसुलीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button