Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शरद पवार आणि अजित यांनी एकत्र यायला पाहिजे’; सुनंदा पवार यांचं मोठं विधान

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. १२ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार आणि अजित यांनी एकत्र यायला पाहिजे, असं सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे.

सुनंदा पवार म्हणाल्या, की कालची भेट कौटुंबिक होती. शरद पवार ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व लोक आले होते. दरवर्षी आम्ही सर्व कुटुंबिय शरद पवारांना भेटत असतो. आता कुटुंब म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते.

हेही वाचा     –      अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबादमधून अटक; नेमकं कारण काय?

मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा. शरद पवार यांनी ६० वर्ष राजकारणात काढले आहेत. हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे किंवा करू नये, हे मी नाही सांगू शकत, असं सुनंदा पवार म्हणाल्या.

रोहित पवारांना पक्षात संधी मिळायला हवी का? यावर सुनंदा पवार म्हणाल्या की, फक्त रोहित पवारच नाही तर इतरही जे तरूण नेते पक्षात आहेत, त्यांना संघटनेच्या कामाची जबाबदारी द्यायला हवी. यामुळे पक्ष आणखी चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो. रोहितसह आणखीही तरूण आमदार निवडून आले आहेत. या नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button