लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? अदित्य तटकरेंचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाल्या..

Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुतीला झाला. पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २१०० रूपये देऊ असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीपुर्वी दिले होते. मात्र आता या योजनेत मोठा बदल हेणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना आम्ही ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. २ कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाहीये. त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात. मी आता त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही.
हेही वाचा – विधानसभा मावळचे आमदार सुनील शेळके आज मंत्रीपदाची शपथ घेणार?
छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील. मी मंत्री असताना अशा तक्रारी आल्या नव्हत्या. आत्ता आल्यात की नाही ते मला माहिती नाही. कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आता तक्रारी आल्यात की नाही यासंदर्भातील मला माहिती नाही. अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले आहेत. त्यामुळे पुढच्या कालावधीत ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना जर छाननी करायची असेल तर तक्रारींच्या आधारावरच केली जाईल. भविष्यात अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत मी आत्ता भाष्य करू शकत नाही, असं आदिती तटकरे म्हणाल्या.




