ताज्या घडामोडीपुणेराजकारण

माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला! राजकीय वातावरण चांगलेच तापले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे हल्ला झाल्याचे निष्पन्न

Share On

पुणे : विश्रांतवाडी परिसरात माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

हल्ल्याचे कारण आणि आरोपींची कबुली
चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, रेवण तानाजी लगस (वय २०, रा. गोकुळनगर, कात्रज) आणि प्राणजीत अच्युत शिंदे (वय २४, रा. हांडेवाडी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी हल्ल्याचे कारण सांगताना राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोडून राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे दगडफेक केल्याचे कबूल केले.

राजकीय संघर्षाचा ताण
पुण्यातील वडगावशेरी विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांगलाच राजकीय संघर्ष उफाळला होता. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि शरद पवार गटाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यात परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप झाले होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान चंद्रकांत टिंगरे आणि रेखा टिंगरे यांनी महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार बापूसाहेब पठारे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महायुतीला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

हल्ल्यानंतरची परिस्थिती
हल्ल्यानंतर चंद्रकांत टिंगरे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेत महाविकास आघाडीचे नेते आणि बापूसाहेब पठारे यांनी रुग्णालयात भेट दिली होती.

पोलिस तपास सुरू
विश्रांतवाडी पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपींनी कबुली दिली असली तरी या हल्ल्यामागे अन्य कोणी असू शकते का, याचाही शोध घेतला जात आहे. स्थानिक पातळीवर राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षेचे पावले उचलली आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button