ताज्या घडामोडीराजकारण

डोनाल्ड ट्रम्प यांची हमास दहशतवादी संघटनेला मोठा इशारा

जग तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी तर नाही ना? अशी भीती व्यक्त

अमेरिका : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे मध्य-पूर्वेसंबंधात अमेरिकेची कणखर भूमिका पहिल्यांदाच समोर आली आहे. यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्त्रायलला बाहेरून मदतीचा ओघ सुरू ठेवला. पण ट्रम्प यांनी थेट मैदानात उतरण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी तर नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वीच त्यांनी गाझा पट्टीमधील हमास या दहशतवादी संघटनेला मोठा इशारा दिला आहे.

काय आहे धमकी?
गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या इस्त्रायल नागरिकांना 20 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या शपथविधीपूर्वी सोडा, नाहीतर मध्य-पूर्वेत विध्वंस करेल. अशी धमकी नवीन राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. या धमकीमुळे मध्य-पूर्वेत पुन्हा युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीच्या बायडेन सरकारने इस्त्रायलला मदतीचा ओघ सुरू ठेवला होता. पण त्याचे लक्ष्य युक्रेन-रशिया युद्धावर अधिक होते. ट्रम्प यांचे धोरण रशियाला अनुकूल मानण्यात येत आहे.

या ओलिसांना 20 जानेवारीपूर्वी मुक्त करा. तसे केले नाही तर मध्य-पूर्वेत विध्वंस करेल. जे माणुसकी सोडून सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करत आहेत. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा असेल. जर त्यांनी या काळात योग्य कार्यवाही केली नाही. तर अमेरिका अशी शिक्षा देईल, जी आजपर्यंत कोणालाही मिळाली नाही. असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

इस्त्रायली नागरिकांना ठेवले ओलीस
गेल्या वर्षी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलच्या सीमावर्ती भागात हल्ला चढवला होता. त्यावेळी त्यांनी अनेक निरपराध नागरिकांना मारले. तर अनेकांना ओलीस ठेवले. इस्त्रायलने त्यांच्याविरोधात युद्धा पुकारल्यानंतर त्यातील काही नागरिकांची, विशेषतः महिलांची सुटका करण्यात आली होती. तरीही 250 पेक्षा अधिक नागरीक अजूनही हमासच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये गाझा पट्टीत 101 परदेशी नागरीक आणि इस्त्रायल नागरीक ओलीस असल्याची माहिती समोर येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button