Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला पण..’; देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला त्या सगळ्याची कल्पना आहे. त्या लोकांनी (देशमुख व वाझे) मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मला ते सगळं माहिती आहे. त्या लोकांनी (देशमुख, वाझे व मविआ) मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्यांनी असे प्रयत्न केले. परंतु, ईश्वर माझ्या पाठिशी आहे, जनता माझ्या पाठिशी आहे.
चांदीवाल नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा      –        ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची अमित ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले..

अनिल देशमुख, पलांडे, परमबीर सिंग यांना आम्ही दंड भरायला लावला होता. आम्हाला जे शपथपत्र दिलं होतं त्यानुसार सचिन वाझेंनी पुरावे दिले असते तर बराच खुलासा झाला असता. त्यांच्या शपथपत्रात त्यांनी दोन राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती. आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला होता. ती नावं होती अजित पवार आणि शरद पवार. मी त्यांना ही नावं रेकॉर्डवर घेणार नाही, असं सांगितलं. नियमांत बसत नसल्याने मी ते रेकॉर्डवर घेतलं नाही. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. सचिन वाझे व अनिल देशमुख यांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यावेळी हे बोललो नाही कारण चर्चा करण्याला कारण मिळतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी नको होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नाही, असं चांदीवाल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group