Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘आपल्याला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना..’; अमित शाहांकडून फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल (८ नोव्हेंबर) शिराळा येथे सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तसेच, आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे, असं सूचक विधान अमित शाह यांनी केलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

मी लोकसभेलाही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. जनतेची एकच भावना आहे की, आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे.

हेही वाचा     –        ‘एक हैं तो सेफ है’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा 

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हायला हवे की नको? पण महाविकास आघाडीचे नेते याला विरोध करत आहेत. जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवून घेतात, ते उद्धव ठाकरेही या नामकरणाला विरोध करत आहेत. मी शरद पवारांना आज आव्हान देतो, तुम्ही कितीही जोर लावा पण संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगरच राहणार. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही कलम ३७० हटविले. संपूर्ण देशाने याला पाठिंबा दिला. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार याला विरोध करत आहेत. मी आज शरद पवार यांना आव्हान देतो की, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत, असंही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, अमित शाह यांच्या बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांचे कौतुक केले. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्याची फडणवीस यांची इच्छा महायुती सरकार सत्तेवर आल्यावर मी पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथील प्रचारसभेत सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button