Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर, ‘या’ नेत्यांना उमेदवारी जाहीर
![Third list of NCP Sharad Pawar group announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Sharad-Pawar-5-780x470.jpg)
पुणे | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९ जणांची उमेदवारांच्या नावीची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर
- कारंजा-ज्ञायक पाटणी
- हिंगणघाट-अतुल वांदिले
- हिंगणा-रमेश बंग
- अणुशक्तीनगर-फहद अहमद
- चिंचवड-राहुल कलाटे
- भोसरी-अजित गव्हाणे
- माजलगाव-मोहन जगताप
- परळी-राजेसाहेब देशमुख
- मोहोळ-सिद्धी रमेश कदम