Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार लखन मलिकांना अश्रू अनावर; म्हणाले..

Lakhan Malik | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षानेही उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आतापर्यंत १२१ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी आता भाजपाने पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना वाशीममधून संधी दिली आहे.

विद्यमान आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट होताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. इमानदारीने पक्षाचं काम केलं. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. पक्षाने माझ्यावर थोडातरी विश्वास ठेवायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया देत आमदार लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा    –      भाजपकडून विद्यमान आमदारांनाच संधी, आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर

लखन मलिक काय म्हणाले?

वाशीम मतदारसंघामधून मी चारवेळा आमदार झालो. त्यामुळे मला माझ्या पक्षावर विश्वास होता की, मला पक्ष तिकीट देईल. मला आताच समजलं की दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे मी आत्ता काही बोलणार नाही. पण सर्व कार्यकर्त्यांना बोलावून माझी भूमिका मी स्पष्ट करेन. मात्र, आमच्या नेत्यांनाच माहिती की मला उमेदवारी का दिली नाही? आम्ही इमानदारीने पक्षाचं काम केलं. त्यामुळे आम्हाला विश्वास होता की आम्हाला तिकीट मिळेल. पण आता माझ्यावर अन्याय झाला आहे. कारण मला संधी द्यायला हवी होती. मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. पक्षाला बदनाम केलेलं नाही. कोणालाही फसवलं नाही. त्यामुळे पक्षाने माझ्यावर थोडातरी विश्वास ठेवायला पाहिजे होता, असं आमदार लखन मलिक म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group