ताज्या घडामोडीपुणेराजकारण

निवडणुकीत तुमचे फक्त दहा दिवस द्या; तुमच्यासाठी पाच वर्ष रक्ताचे पाणी करेल : आमदार सुनील शेळके

महिलांचा मोठा सहभाग: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी

मावळ : ‘‘विधानसभा निवडणुकीत तुमचे फक्त दहा दिवस मला द्या, तुमच्यासाठी हा सुनील शेळके पाच वर्ष रक्ताचे पाणी करेल.’’ तुमच्या सुखदुःखात आणि अडीअडचणीत तुमच्यासोबत उभा राहील हा विश्वास आज पोटोबा महाराजांच्या समोर तुम्हाला सर्वांना देतो अशी भावनिक साथ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित जनसमुदायाला घातली आहे.

2019 पेक्षा जास्त प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आमदार सुनील शेळके यांनी आज मावळ विधानसभेसाठी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार सुनील शेळके यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून वडगाव मावळ येथे नागरिक येण्यास सुरुवात झाली होती. 12:30 वाजण्याच्या सुमारास आमदार सुनील शेळके आपल्या समर्थकांसह मावळ तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या पोटोबा महाराजांच्या मंदिरात दाखल झाले.

नजर जाईत तथपर्यंत गर्दी…
पोटोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची भव्य दिव्य अशी रॅली ही पंचायत समिती चौकामध्ये दाखल झाली. त्या ठिकाणी सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. हजारोंच्या संख्येने समर्थक वडगाव मावळ येथे दाखल झाल्याने वडगावातील सर्व रस्ते हे गर्दीने तुडुंब झाले होते. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पंचायत समिती चौक ते वडगाव शहराचे प्रवेशद्वार दरम्यान सर्वत्र नजर जाईल तिथपर्यंत माणसंच माणसं दिसत होती. मागील पाच वर्षे सातत्याने मावळच्या जनतेसाठी केलेली कामे व त्यामधून मिळालेले त्यांचे प्रेम यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जनसमुदाय मला आशीर्वाद देण्यासाठी, माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे आला असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी व्यासपीठावरून सांगितले. गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक रस्ते बंद करण्यात आले होते मोठ्या प्रमाणात पोलीस पाऊस वाटा वडगाव मध्ये बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता.

मावळ तालुका समृद्ध बनवण्याचा संकल्प…
उमेदवारी अर्ज दाखल करत सभास्थळी आमदार सुनील शेळके दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माऊली भाऊ दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे यांची मनोगते झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. आमदार सुनील शेळके म्हणाले मागील पाच वर्ष मला जे जे काही माझ्या मायबाप जनतेसाठी करता आले ते सर्व काही करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता तुम्ही तुमचे दहा दिवस मला द्या, पुढील पाच वर्ष हा सुनील शेळके तुमच्यासाठी रक्ताचे पाणी करेल, तुमच्या सुखदुःखात, तुमच्या अडीअडचणीत तुमच्या सोबत उभा राहील. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मला मावळ तालुक्यातील सर्व जनतेला मोफत आरोग्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या मावळ तालुक्याला समृद्ध बनवण्याचा माझा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदारकी लोकांच्या हितासाठी हवी…
विरोधक माझ्यावर टीका करत आहेत, मात्र विकास विकास कामावर बोलायला तयार नाही. मी माझ्या मायबाप जनतेसाठी जे काम करत आहे, जी सेवा त्यांना देत आहे त्याच्यावर टीकाटिपणी करण्यापेक्षा त्यापेक्षा उत्तम काम तुम्ही करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्या. मला आमदारकी ही गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी हवी आहे, स्वतःचे घर भरण्यासाठी नकोय असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे. स्वार्थासाठी तालुक्यातील काही जण एकत्र आले असून त्यांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र सर्वसामान्य जनता ही माझ्या सोबत आहे व तीच माझी ताकद आहे. ही निवडणूक माझी नसून मावळ तालुक्यातील सर्वसामान्य मायबाप जनतेची असल्याचा पुनरुच्चार आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button