Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांपैकी ‘या’ सात आमदारांनी घेतली शपथ

मुंबई | राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी १२ आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी १२ पैकी ७ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी १२ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी महायुतीचा फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला होता. यानुसार भाजप ३, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी २-२ जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादीकडून इंद्रीस नायकवाडी, पंकज भुजबळ यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे. नुकताच या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button