Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘प्रधानमंत्री आवास’मधील ५ हजार सदनिकाधारांना अखेर दिलासा!

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनकडून मानले आभार

पिंपरी । प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील प्राधिकरण सेक्टर- १२ मध्ये उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील तब्बल ४ हजार ८८३ सदनिकाधारकांवर चुकीच्या पद्धतीने आकारलेली मिळकतकर आकारणीत सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे आवास योजनेतील सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२, मौजे बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत गृहप्रकल्प १ व २ मधील सदनिका व दुकाने यांची मिळकत कर आकारणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यापासून केली जात आहे. तशी बिलेही मिळकतधारकांना दिली आहेत. त्यामुळे सदनिकांचा ताबा मिळाल्यापासून मिळकतकर आकारणी करावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सदनिकाधारकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. यावर आमदार लांडगे यांच्या सूचनेनुसार, सदनिकाधारकांचे प्रतिनिधी आणि पीएमआरडीएचे अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांची बैठक झाली होती. त्यावेळी मिळकतकर आकारणीमध्ये सुधारणा करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार, प्राधिकरण प्रशासनाने लेखी पत्र महानगरपालिका करसंकलन विभागाचे सहायक आयुक्तांना दिले.

हेही वाचा    –      एसटीची दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

दरम्यान, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे आणि सामाजिक कार्यकर्ते शिवराज लांडगे यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची भेट घेतली. महानगरपालिका करसंकलन विभागाकडून चुकीच्या पद्धतीने मिळकत कर आकारणी सुरू केल्याबद्दल सविस्तर चर्चा केली. तसेच, पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेले सुधारित कर आकारणीबाबतच्या पत्रानुसार तात्काळ कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी केली.

‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडून महापालिका कर संकलन विभागाला पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना सदनिकांचा ताबा मिळाल्यापासून कर आकारणी करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे सोसायटी फेडरेशनच्या आणि सदनिकाधारकांच्या मागणीनुसार मिळकतकर आकारणीबाबत सुधारीत पावती देण्यात येतील.

– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त.

प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वसामान्य सदनिकाधारक लाभार्थींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यापासून केलेली मिळकतकर आकारणी चुकीची आणि अन्यायकारक होती. त्यामुळे सदर ५ हजार सदनिकाधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. पीएमआरडीए आणि महानगरपालिका अस्थापनांनी तसेच आमदार महेश लांडगे यांनी याकामी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे सदर सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button